जळगाव । गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला सोन्याने उच्चांक गाठला असून, जीएसटीशिवाय 24 कॅरेट सोन्याचा दर एक लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. चांदी दरानेही नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. मागील पाच दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या भावामध्ये प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या वेळी दरात वाढ झाल्याने खरेदीवर परिणाम झाल्याचे म्हटले जात आहे.
जळगाव सुवर्णनगरीमध्ये जीएसटी विना २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ८०० रुपयांवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्याव्यतिरिक्त जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचे भाव १ लाख ३ हजार ८२४ रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटी विना २२ कॅरेट सोन्याचे भाव ९२ हजार ३३० रुपयांवर आणि जीएसटीसह २२ कॅरेट सोन्याचे भाव ९५ हजार ९९ रुपयांवर गेले आहेत.
सोन्याप्रमाणे जळगाव सुवर्णनगरीत चांदीच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. अगदी सोन्याप्रमाणेच चांदीचे भावही एक लाख रुपयांच्या वर गेल्याची माहिती समोर आली आहे. चांदीचे भाव जीएसटी विना १ लाख १७ हजार ५०० रुपयांवर गेले आहेत. तर जीएसटीसह चांदीचे भाव १ लाख २१ हजार ३० रुपयांवर पोहोचले आहेत.















Discussion about this post