जळगाव : मागच्या काही दिवसांपासून शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ-उतार सुरू असल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारी सुद्धा दोन्ही धातुंच्या किमतीत मोठे बदल पाहण्यास मिळाले. चांदीने नवीन उच्चांक निर्माण केला, सोन्यातही तेजी पाहण्यास मिळाली. ज्या कारणाने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
शनिवारी सोने १००० तर चांदी २५०० रुपयांनी वधारली. त्यामुळे सोने १ लाख ६०० रुपये प्रतितोळा तर चांदी १ लाख १७ हजार ५०० रुपये प्रती किलोवर पोहोचली.
तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात वाढ होत आहे. यामध्ये सोन्याच्या भावात २१ ऑगस्ट रोजी ३०० रुपये, २२ रोजी १०० रुपयांची वाढ होऊन ते ९९ हजार ६०० रुपयांवर पोहोचले होते. २३ रोजी त्यात पुन्हा एक हजार रुपयांची वाढ होऊन ते १ लाख ६०० रुपये प्रती तोळ्यावर पोहोचले आहे. दुसरीकडे चांदीच्या भावात २१ ऑगस्ट रोजी २ हजार, २२ रोजी १ हजार रुपयांची वाढ होऊन ती १ लाख १५ हजार रुपयांवर पोहोचली होती.
२३ रोजी त्यात पुन्हा २ हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती १ लाख १७हजार ५०० रुपये प्रती किलोवर पोहोचली. चांदीच्या भावातील हा नवा उच्चांक आहे. या पूर्वी चांदी १ लाख १६ हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती. सध्याच्या भावानुसार एक किलो चांदीसाठी जीएसटीसह १ लाख २१ हजार २५ रुपये मोजावे लागणार आहे.















Discussion about this post