जळगाव । दिवाळीपूर्वी सोन्यासह चांदीने मोठी उसळी घेतल्याचं दिसून आली. ऐन सणासुदीत दोन्ही धातूंचे दर गगनाला भिडल्याने ग्राहकांना घाम फुटला होता. मात्र दिवाळी मुहूर्तानंतर सोने दरात मोठी घसरण झाली. सोबतच चांदीही घसरली. मात्र आता दोन तारखेपासून लग्नसराई सुरू झाल्यानंतर लगेचच दोन्ही धातुंच्या दरात पुन्हा तेजी दिसून आली आहे. आज
तुलसी विवाहानंतर सर्वदूर लग्नसराईची सुरूवात झाली असून, सोने आणि चांदीची मागणी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्याच्या किमती वाढल्या आहेत,
जळगाव सराफ बाजारात आज सोमवारी सोने दरात ३०९ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने एक लाख २४ हजार ८३६ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. दुसरीकडे चांदी दरात ३०९० रूपयांची मोठी वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदी एक लाख ५७ हजार ५९० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचली.
लग्नसराईच्या हंगामामुळे आणि मागणीत वाढ झाल्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती पुन्हा वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लग्नसराईच्या काळात सोने-चांदी आवर्जून खरेदी केली जाते. येत्या आठवड्यात सोन्याची मागणी आणखी वाढेल, ज्यामुळे किंमतीत आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.















Discussion about this post