मुंबई । गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने बदल होत आहे. ऐन लग्नसराईच्या वेळी सोन्याचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे.मात्र मागच्या काही दिवसापासून दरवाढीला ब्रेक लागला आहे. उच्चांकीपासून सोने दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यापुढे सोन्याच्या किंमती वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
सोन्याचे दर
आज २२ ग्रॅम सोन्याची किंमत ८७,५५० रुपये प्रति तोळा आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७०,०४० रुपये आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात एका रुपयानेही वाढ झालेली नाही.
आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ९५,५१० रुपये प्रति तोळा आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७६,४०८ रुपये आहे.१८ कॅरेट सोन्याचे दर ७१,६४० रुपये प्रति तोळा होते. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५७,३१२ रुपये आहेत.
चांदीचे दर
आज चांदीच्या दरातदेखील काहीच बदल झालेला नाही. १० ग्रॅम चांदीची किंमत ९८० रुपये झाली आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,८०० रुपये आहेत. चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही.
Discussion about this post