मुंबई । तुम्हीही आज सोने खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. आज सोनं स्वस्त झालं असलं तरी चांदी मात्र महागली आहे. त्यामुळे आजच्या किंमती काय आहेत ते जाणून घेऊ.
२२ कॅरेट सोन्याच्या किंमती
आज २२ कॅरेट १०० ग्राम सोनं १०० रुपयांनी कमी झालंय. त्यामुळे याचे दर ६,५८,४०० रुपयांवर पोहचलेत. तर १० ग्राम सोन्याचा दर ६५,८४० रुपये इतका आहे. ८ ग्राम २२ कॅरेट सोन्याची किंमत ५२,६७२ रुपयांनी विकलं जात आहे.
२४ कॅरेट सोन्याच्या किंमती
२४ कॅरेट सोन्याच्या किंमतींमध्ये देखील बदल झाला आहे. १०० रुपयांनी सोनं स्वस्त होऊन ७,१८,१०० रुपये १०० ग्राम सोन्याची किंमत झाली आहे. तर एक तोळा सोन्याची किंमत ७१,८१० रुपये आहे आणि ८ ग्राम सोनं ५७,४४८ रुपये किंमतीने विकलं जात आहे.
मुंबई पुण्यातील किंमती
मुंबईत २४ कॅरेट सोनं ७,१६६ रुपये एक ग्राम सोन्याची किंमत आहे. तर पुण्यात देखील एक ग्राम सोनं ७,१६६ रुपयांना विकलं जात आहे.
चांदीच्या किंमती
चांदीच्या किंमती आज वाढल्या आहेत. आज १ किलो चांदीची किंमत १०० रुपयांनी वाढलीये. त्यामुळे आजचा भाव ९१,८०० रुपये इतका आहे.















Discussion about this post