जळगाव । सध्या लग्नाचा हंगाम सुरू असल्यामुळे सोन्याची मागणी प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. लग्नासारख्या शुभ प्रसंगी लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरम्यान आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ दिसून आली.
देशात पुन्हा एकदा सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत असून, मधल्या एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता गेल्या काही आठवड्यांपासूनचा हा कल सतत कायम आहे. सोन्याचे दररोज दर वाढताना दिसत असल्याने सामान्य ग्राहकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, सध्या देशभरात लग्नाचा हंगाम सुरू आहे. परंपरेनुसार या काळात मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते. मात्र, सतत वाढणाऱ्या किमतींमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक बजेट पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
जळगाव शहरातही शहरात आज बुधवारी सकाळी बाजार उघडल्यावर १० तोळ्यासाठी तब्बल ११ हजार ३३० रूपये तसेच १० ग्रॅमसाठी ११३३ रूपयांची वाढ नोंदवण्यात आली. परिणामी, सोने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३२ हजार ५६१ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.
चांदीत १०३० रूपयांनी वाढ
दुसरीकडे आज बुधवारी सकाळी बाजार उघडल्यावर पुन्हा १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदी तीन टक्के जीएसटीसह एक लाख ८४ हजार ३७० रूपयांपर्यंत वधारली.















Discussion about this post