मुंबई । जुन महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या दरानं उच्चांकी गाठली आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात वाढ झाली आहे. सोने दरात वाढल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.
आज मंगळावार ३ जून रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये १० ग्रॅम सोन्याचा दर ९९,००० रूपयांवर गेला आहे. दिल्लीत २२ आणि २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ६०० रूपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०, ८५० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,०६० रूपये प्रति १० ग्रॅम आहे. तर, मुंबईत प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,८०० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,०६० रूपयांवर पोहोचला आहे.
सोनं का महागले?
जगभरात राजकीय आणि व्यापारी तणाव वाढत असल्याने सोमवारी सोन्याच्या किमती वाढल्या आहे. डॉलरची किंमत घसरली आहे. यामुळे सोने खरेदी करणे अधिक फायदेशीर झाले आहे. या कारणांमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. यामुळे सोन्याच्या किमतीतही वाढ झाली आहे.
चांदीच्या दरातही वाढ
सोन्याच्या दरात होणाऱ्या वाढीसह चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. मंगळवार ३ जून रोजी चांदीचा भाव १,००,१०० रूपयांवर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत त्यात १०० रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.
Discussion about this post