मुंबई । गेल्या काही दिवसापासून सोने दरात सतत बदल पाहायला मिळतोय. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जातेय. मात्र यातच सोन्याचा दर पुन्हा वाढत असल्याचं दिसत आहे. सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी वाढल्याने ग्राहकांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे.
मनी कंट्रोल वेबसाईटच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम फक्त १० रुपयांनी महाग झाल्याची माहिती आहे. तर एक दिवस आधी म्हणजे काल सोन्याची किंमत २२०० रुपयांनी वाढली होती. याशिवाय आज सलग दुसऱ्या दिवशी एक किलो चांदी महाग झालीये. चांदीची किंमत 10 रुपयांनी वाढली आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७५८० रुपये आहे. याशिवाय २२ कॅरेटची किंमत प्रति १० ग्रॅम ८९४६० रुपये आहे. तर सलग दोन दिवसांत चांदीच्या किमतीत प्रति किलो ३१०० रुपयांची वाढ झाली आहे. आज २२ मे रोजी चांदी १,००,१०० रुपये प्रति किलो दराने विकण्यात येतेय.
Discussion about this post