जळगाव । ट्रम्प टेरिफच्या दादागिरीमुळे जागतिक बाजारात अस्थैर्य असल्याने सोने दरात सातत्याने वाढ होत असून शनिवारी सराफा बाजारात पुन्हा ६०० रुपयांची वाढ नोंदवली गेली. आता सोने प्रति १० ग्रॅम ९३,८०० रुपयांवर गेले असून जीएसटीसह त्याचा दर ९६,६१४ रुपये झाला आहे.
शुक्रवारी सोन्याच्या भावात प्रति तोळा १९०० रुपयांची वाढ झाली होती. दागिन्यांसाठी लागणारे २२ कॅरेट सोन्याचा दर ८५,९८६ वर गेला आहे. त्यात तोळ्यामागे ५५० रुपयांची वाढ झाली. चांदीचा दर मात्र प्रति किलो ९५,००० रुपयांवर कायम आहे आठवडाभरात सोने दरात ४३०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या शनिवारी ५ एप्रिल रोजी सोने दर प्रति १० ग्रॅम ८९,५०० रुपये होता. १२ एप्रिल रोजी हा दर ९३,८०० रुपयांच्या नव्या उच्चांकावर गेला आहे.
चांदीत ५ हजाराने वाढ, प्रति किलो ९५ हजारांवर
चांदीच्या दरातही आठवडाभरात ५ हजार रुपयांची वाढ झाली आहे. ५ एप्रिल रोजी चांदी प्रति किलो ९० हजार रुपये होती. १२ एप्रिल रोजी त्याचा दर प्रति किलो ९५ हजार रुपये झाला.















Discussion about this post