मुंबई । गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव वाढत असल्याचं चित्र असून अमेरिकेच्या आर्थिक धोरणांचा परिणाम जागतिक बाजारावर दिसून येत आहे. सततच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र मोठा फटका बसताना दिसतोय.
दरम्यान, सोन्याचे दर कधी खाली येतील याकडे ग्राहकांचे लक्ष लागले असून मात्र यातच आजच्या दिवशी देखील सोन्याचे दर वधारले आहेत. शुक्रवारी म्हणजेच आज १४ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,005 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,040 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,050 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,310 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,848 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,731 रुपयांनी विकलं जात आहे.
Discussion about this post