मुंबई । आज तुम्ही जर सोने खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याने आज 15 डिसेंबर रोजी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातु तेजीत दिसून आले. मात्र, आठवड्याच्या शेवटी किमती खाली उतरताना दिसून आल्या.
या आठवड्यात सोन्याच्या भावात 2 हजारांची वाढ दिसून आली. 9 डिसेंबर रोजी सोने 160, 10 डिसेंबरला 820 रुपये तर 11 डिसेंबर रोजी 870 रुपयांनी सोने महागले. तर 13 डिसेंबर रोजी सोने 600 रुपयांनी स्वस्त झाले. आज सकाळच्या सत्रात देखील सोन्याने आनंदवार्ता दिली आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,002 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या आठवड्यात चांदीने देखील ग्राहकांना खुश केलं आहे. चांदीमध्ये 4 हजारांची मोठी घसरण दिसून आली. तर बुधवारी एक हजारांनी किंमती उतरल्या. 13 डिसेंबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,500 रुपये इतका आहे.
Discussion about this post