आज रक्षाबंधन,,, बहीण भावाच्या नात्याचा खास असा सण.. परंतु आजच्या या शुभदिवशी सोने- चांदीच्या किमतीत मात्र मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज २४ कॅरेट १० ग्राम सोने 71190 रुपयांवर व्यवहार करत असून आधीच्या तुलनेत या किमतीत ०.३६ टक्के म्हणजेच 252 रुपयांची वाढ झाली आहे तर चांदीच्या किमती सुद्धा 721 रुपयांनी महाग झाल्या असून १ किलो चांदीचा भाव सध्या 83746 रुपयांवर व्यवहार करत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमतीत आज चांगलेच चढउतार पाहायला मिळाले. सकाळी ९ वाजता ७११०० रुपयांपासून सोन्याचा व्यवहार सुरु झाला. थोड्याच वेळात या किमतीत वाढ होत गेली. ९ वाजून ४१ मिनिटांनी सोन्याचा भाव ७११८५ रुपयांवर पोचला. त्यानंतर सोन्याच्या किमती थोड्याफार खाली गेल्या मात्र १२ वाजून १५ मिनिटांनी सोन्याच्या किमतींनी ७१२४३ रुपयांचा उच्चांक गाठला. सध्या २४ कॅरेट १० ग्राम सोने 71190 रुपयांवर व्यवहार करत आहेत. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर ६६७०० रुपये आहे तर २४ कॅरेट सोने ७२७७० रुपये प्रति तोळा आहे. तर एक किलो चांदीचा भाव ८६००० रुपये इतका आहे.
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
पुणे- 66,700 रुपये
मुंबई – 66,700 रुपये
नागपूर – 66,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
पुणे- 72,770 रूपये
मुंबई – 72,770 रूपये
नागपूर – 72,770 रूपये
Discussion about this post