अमेरिका इजरायल आणि इराण यांच्यात असुर असलेल्या युद्धामुळे सोन्या-चांदीचे दर वाढतील असा अंदाज वर्तवला जात होता. पण गेल्या काही दिवसांपासून दोन्ही धातूंचे दर घसरताना पाहायला मिळाले. दरम्यान, आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर कोसळल्याचे पाहायला मिळाले. त्याशिवाय चांदीच्या तरातही दोन हजारांची कपात नोंदवण्यात आली आहे. जळगावातील सराफा बाजारात नेमकी किंमत किती आहे? पाहूयात.
मागील दोन दिवसांच्या तुलनेत सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी खरेदीदारांना मोठा फायदा झालाय. अमेरिका इजरायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. पण आठवड्यात सोन्याच्या दराला पुन्हा एकदा उतरती कळा लागल्याचे दिसतेय. शनिवारच्या तुलनेत आज सोमवारी सराफा बाजारात घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे दर १६१००० वरून १५९५०० रूपयांवर आले आहे.
शनिवार-रविवार बाजारपेठ बंद झाल्यानंतर आता सोमवारी काय होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मागील दोन दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या दरात पंधराशे रूपयांची घसरण झाली आहे. जीएसटीशिवाय सोन्याचे दर १६१००० वरून १५९५०० वर खाली आले आहेत. तर चांदीच्या दरात ही दोन दिवसात दोन हजार रूपयांची घसरण होऊन चांदीचे दर जीएसटी २६८००० हजार रूपयांवरून २६६००० वर खाली आले आहेत. युद्धजन्य परिस्थिती असल्याने गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा क्रूड तेलामध्ये गुंतवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात सोने चांदीच्या दरात घसरण होत असल्याचं सोने व्यावसायिक सांगत आहेत.















Discussion about this post