मुंबई । गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात काहीशी घसरण झाली होती. मात्र चालू आठवड्यात पुन्हा सोन्याला झळाळी आल्याचे चित्र आहे. सोन्याच्या दरातील तेजीमुळे नवा उच्चांकी दर गाठल्याचं पहायला मिळालं. सोन्याचा प्रति तोळा जवळपास लाखाचा टप्पा गाठला आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.
जाणून घ्या सोन्याच्या 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव काय आहे.
आज गुरुवारी (5 जून 2025) सोन्याच्या दरात मोठी झाली आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 430 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर 99,170 रुपयांवरुन 99,6000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे हा दर 90,900 रुपयांवरुन 91,300 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.सोन्याच्या दरातच वाढ झालेली असताना चांदीच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 2000 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे चांदीचा दर 1,02,000 रुपयांवरुन 1,04,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे.
Discussion about this post