मुंबई । सोने खरेदीची योजना आखणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. सोन्याच्या किंमतीत आज वाढ झाली आहे. सोनं प्रतितोळा ३ हजार रुपयांनी महागलं आहे. सोबतच चांदीचा दरही महागला आहे. यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात सोन्यासह चांदीच्या किंमती वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सोने-चांदीचे दर घसरले होते. मात्र आज भारतात सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. अमेरिकन टॅरिफचा परिणाम सोने चांदी दरात दिसून येत आहे.
आज दहा ग्रॅम सोन्याचे भाव ३००० आणि चांदीचे भाव ३०० रुपयांनी वाढले. हे भाव चढउतारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. आज झालेल्या दरवाढीनंतर १० ग्रॅम म्हणजे एक तोळा २४ कॅरेट सोन्याचा भाव 93,530 रुपये इतका आहे. चांदीचा दर देखील ९५००० रुपयावर पोहोचले आहे. दरम्यान, नऊ दिवसात सोने ३ हजारांनी आणि चांदी ९ रुपयांनी घसरली होती. पुढे मौल्यवान धातूंचे भाव वाढतील, असे तज्ज्ञांनी सांगितले
Discussion about this post