मुंबई । सोन्याच्या दरात सुरू असलेली तेजी कायम असल्याचं पहायला मिळत आहे. अर्थसंकल्पात सरकारकडून कर सवलतीची घोषणा होईल आणि सोने स्वस्त होईल अशी अपेक्षा होती मात्र, तसे झालेले नाहीये. सोन्याची वाढती मागणी, लग्नसराई यामुळे सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. बुधवारी (5 फेब्रुवारी) सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोने आता नव्या उच्चांकी दरावर पोहोचले आहे. जाणून घ्या सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांनी वाढ झाली आहे आणि आजचा सोन्याचा दर काय आहे.
बुधवारी(5 फेब्रुवारी 2025) सोन्याच्या दरात तेजी दिसत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10400 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 8,52,000 रुपयांवरुन 8,62,400 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1040 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर 85,200 रुपयांवरुन 86,240 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
24 कॅरेट सोन्याचा आजचा दर
जळगाव 86,240 रुपये
मुंबई 86,240 रुपये
पुणे 86,240 रुपये
नागपूर 86,240 रुपये
कोल्हापूर 86,240 रुपये
सांगली 86,240 रुपये
बारामती 86,240 रुपये
Discussion about this post