सोन्याचे दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी एक बातमी आहे. बुधवारी सोन्याला प्रचंड गती मिळाल्याने सर्व विक्रम मोडीत काढले. यासह सोन्याने आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक गाठला.
जळगावमध्ये सोन्याचा भाव ६३० रुपयांनी वाढून ८२,७०० रुपये प्रति तोळा इतका झाला. तर, चांदीच्या दरातही १००० रुपयांची वाढ होऊन ती ९४,००० रुपये प्रति किलोवर पोहोचली.
सलग सहाव्या दिवशी वाढ :
गेल्या सहा दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक बाजारातील वाढ आणि गुंतवणूकदारांकडून होत असलेली खरेदी ही या दरवाढीमागीलप्रमुख कारणे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
जानेवारी महिन्यात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा भाव ७८,९५० रुपये प्रति तोळा होता. १ जानेवारी २०२५ रोजी तो ४४० रुपयांनी वाढून ७९,३९० रुपयांवर पोहोचला. त्यानंतरही वाढ सुरूच राहिली आणि आज (23 जानेवारी) हा दर ८२,७०० रुपयांवर पोहोचला. म्हणजेच, जानेवारीच्या या २२ दिवसांत सोन्याच्या दरात ३,७५० रुपयांची (४.७५ टक्के) वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी चांदीचा दर ८९,७०० रुपये प्रति किलो होता. ती आता ९४,००० रुपये प्रति किलोवर पोहोचली.
Discussion about this post