मुंबई । गेल्या आठवड्यात सोने चांदी च्या किमतीने नवीन ऐतिहासिक पातळी गाठली होती. मात्र यांनतर घसरण दिसून आली होती. मात्र आज सोने आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. यामुळे खरेदीदारांना झटका बसला आहे.
आज १० तोळं सोन्याची किंमत ६६०० रूपयांनी वाढले आहे. बुधवारी, सोन्याच्या बाजारात २४ कॅरेटच्या एक तोळं सोन्याची किंमत १००६३० रूपये इतकी झाली आहे. मंगळवारी २४ कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत ९९९७० रूपये इतकी होती. आज यामध्ये ६६० रूपये इतकी वाढ झाली आहे.
जीएसटीसह सोन्याची किमत आणखी वाढते. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये मोठा बदल झाला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्येही आज वाढ दिसून आली. एक तोळा सोन्याची किंमत ९२२२५ रूपये इतकी झाली आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति एक तोळा ७४९९० रूपये इतकी आहे.
MCX पर सोन्याचे दर काय आहेत?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच, एमसीएक्सवर एक तोळा सोन्याची किंमत 98431 रुपए इकी आहे. सकाळी ११ वाजता एमसीएक्सवर सोन्याची किंमत १७० ते १८० रूपयांनी वाढ झाली. जागतिक बाजारात सोन्याची किंमत 3,327.37 डॉलर इतकी झाली. तर भारतामध्ये चांदीची किंमत 113955 रुपए प्रति किलोग्राम झाली आहे. आज चांदीची किंमत २०० रूपयांनी वाढली आहे. जागतिक बाजारात चांदीची किंमत 38.2 डॉलर इतकी आहे.
Discussion about this post