मुंबई । सोने चांदी खरेदीची योजना आखणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या किमतीत किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली.
जागतिक स्तरावर धातूंच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे घसरणीच्या सराफ बाजारात सोन्याचा भाव १०० रुपयांनी कमी झाला आहे. येत्या वर्षात सोन्याचा भाव हा ७२ हजारांचा टप्पा ओलांडू शकतो असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
फेडरल रिझर्व्हच्या नव्या धोरणामुळे जागतिक पातळीवर सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम दिसून येत आहे. सोन्याच्या वाढत्या दराचा परिणाम ग्राहकांसह ज्वेलर्सच्या दुकानावर देखील पाहायला मिळत आहे. यामुळे सोने खरेदीदारांचा कल हा कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७८५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,१०० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात १०० रुपयांनी घट झालेली पाहायला मिळाली. तसेच चांदीच्या किमतीही (Price)घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,६०० रुपये मोजावे लागतील.
२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती?
मुंबई- ६२,९५० रुपये
पुणे – ६२,९५० रुपये
नागपूर – ६२,९५० रुपये
नाशिक – ६२,९८० रुपये
ठाणे – ६२,९५० रुपये
अमरावती – ६२,९५० रुपये
Discussion about this post