मुंबई । मागच्या सहा दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत वाढ होताना दिसून आली आहे. मागच्या तीन आठवड्यानंतर काल सोने उच्चांकी भावावर पोहोचले होते. दरम्यान, आज सोन्याच्या भावात किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. येत्या नवीन वर्षात सोन्याचे भाव वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढत असताना भारतातही लग्नसराईमुळे मोठ्या प्रमाणात मौल्यवान धातूची खरेदी केली जाते. काल सोन्याचा भाव हा ४४० रुपयांनी वाढला होता. ४ डिसेंबर रोजी सोन्याचा भाव प्रतितोळा ६४, ३०० रुपयांच्या ऐतिहासिक उंचीवर पोहोचले. जाणून घेऊया आजचा भाव
आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८७० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,९७० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price)प्रति किलोनुसार १२०० रुपयांनी घसरण झालेली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७८,३०० रुपये मोजावे लागतील.
२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती?
मुंबई- ६३,८७० रुपये
पुणे – ६३,८७० रुपये
नागपूर – ६३,८७० रुपये
नाशिक – ६३,९०० रुपये
ठाणे – ६३,८७० रुपये
अमरावती – ६३,८७० रुपये