जळगाव । अमेरिका आणि चीन या दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील वाढत्या व्यापार युद्धाच्या शक्यतेमुळे जगावर मोठे संकट आले आहे त्यामुळे, सुरक्षित गुंतवणुकीसाठी जागतिक गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहे ज्याचा परिणाम मौल्यवान धातूच्या किमतीवर दिसून येत आहे मागील काही दिवसांपासून सोन्याच्या प्रति तोळा दरांमध्ये चांगलीच तेजी दिसून आली आहे, ज्यामुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर नववधूच्या पित्याची चिंता वाढली आहे.
जीएसटीसह 97900 इतक्या विक्रमी उंचीवर
दरम्यान, जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 48 तासात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये दोन हजार रुपयांची वाढ होऊन, ते जीएसटीशिवाय दर 95000 हजार रुपये तर, जीएसटीसह 97900 इतक्या विक्रमी उंचीवर दर जाऊन पोहोचले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वर लागू केलेल्या 245 टक्के टॅरीफ दराच्या मुळे ही वाढ झाल्याचं सांगितले जात आहे.
तर, चांदीचा एक किलोचा दर पुन्हा एक लाखाच्या घरात पोहचला आहे. बुधवारी (दि. 16) एका दिवसात 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 990 रुपयांनी वाढून 96,170 रुपयांवर गेला. तर, 22 कॅरेटचा भाव 950 रुपयांनी वाढून 88,150 रुपयांवर पोहचला. सोने आणि चांदीवर तीन टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारला जातो. त्याप्रमाणात सोने आणखी महागते. त्यानुसार 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 90,700 ते 99 हजार रुपये असा होता.
Discussion about this post