उद्या ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. सोनं खरेदी करण्यासाठी उद्याचा दिवस शुभ मानला जातो. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण होत होती. मात्र अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस पूर्वी सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
आज मंगळवार २९ एप्रिल रोजी सोन्याचा भाव कालच्या तुलनेत ४०० रुपयांनी महाग झाला आहे. मनी कंट्रोल वेबसाईटच्या माहितीनुसार, २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९,८०० रुपये आणि २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९७,९०० रुपये आहे. दुसरीकडे कालच्या तुलनेत आज चांदी ४०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
२९ एप्रिल २०२५ रोजी म्हणजे आज चांदीचा भाव १,००,५०० रुपये प्रति किलो आहे. दरम्यान २२ एप्रिल रोजी सोन्याच्या किमती १,००,००० रुपयांच्या वर पोहोचल्या होत्या. सोमवारच्या तुलनेत सोनं महागल्यामुळे उद्याची परिस्थिती कशी असेल यामुळे ग्राहक चिंतेत आहेत.
Discussion about this post