जळगाव : भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाल्यामुळे स्थानिक बाजारात सोन्याचे दर सातत्याने वर जाताना दिसत आहेत. दरम्यान गुरुवारी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने दरात घट झाली होती. मात्र आज शुक्रवार सोन्याच्या दरात मोठा बदल नोंदवण्यात आला. ज्याचे पडसाद बाजारात उमटले.
आज शुक्रवारी सकाळी सोने दरात ८२४ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने एक लाख ३२ हजार ५६१ रूपयांवर पोहोचले. यापूर्वी काल गुरूवारी दिवसभरात ८२४ रूपयांची घट नोंदवली गेल्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३१ हजार ७३७ रूपयांपर्यंत खाली आले होते. मात्र आज वाढ झाली.
दुसरीकडे आज सोने दरात वाढ झाली असली तरी चांदी दरात मोठी घसरण झाली. आज चांदी दरात १०३० रूपयांची घट झाली. त्यामुळे चांदी जीएसटीसह एक लाख ८४ हजार ३७० रूपयांवर स्थिरावली. यापूर्वी काल गुरुवारी दिवसभरात आणखी १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ८५ हजार ४०० रूपयांपर्यंत वधारली होती.
यापुढेही रुपयावरील दबाव कायम राहिला तर देशांतर्गत सोने-चांदीचे दर पुन्हा नव्या उच्चांकाजवळ पोहोचू शकतात. दिवाळीपूर्वी १७ ऑक्टोबरला जळगावमध्ये सोन्याने प्रति १० ग्रॅम तब्बल १.३५ लाखांचा उच्चांक गाठला होता. सध्या देखील सोन्याचे दर १.३१ लाखांच्या आसपासच आहे. त्यामुळे रुपयात सुधारणा न झाल्यास सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिक व्यक्त करत आहेत.















Discussion about this post