मुंबई । मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात सातत्याने वाढ दिसून आली. दररोज दोन्ही धातूंचे दर नवनवीन उच्चांक गाठत होते. यामुळे सोने चांदी खरेदी करावी की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडला होता. मात्र आता उच्चांकावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात आता घसरणीला सुरुवात झाली असून यामुळे नवरात्रोत्सवात सोने खरेदीचा विचार करत असाल तर स्वस्तात दागिने खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे
आज गुरुवारी (18 सप्टेंबर 2025) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 5400 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 11,17,100 रुपयांवरुन 11,11,700 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 540 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 1,11,710 रुपयांवरुन 1,11,170 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 5000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 10,24,000 रुपयांवरुन 10,19,000 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरात 500 रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर 1,02,400 रुपयांवरुन 1,01,900 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
आजचा चांदीचा दर किती?
सोन्याच्या दरात घसरण झालेली असताना चांदीच्या दरात सुद्धा मोठी घसरण पहायला मिळत आहे. या घसरणीमुळे चांदीचा दर 1,31,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे.















Discussion about this post