जळगाव । आता सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. अनेकजण चांगला मूहूर्त साधत सोने खरेदी करतात. दरम्यान आज सोन्याच्या दरात फार काही बदल झालेला नाही. सोन्याचे दर जैसे थे वैसे आहेत. आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे फक्त १० रुपयांनी घसरले आहेत. आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ९८,१७० रुपये आहेत. काल हेच दर ९८,१८० रुपये होते. आज १०० ग्रॅम सोन्यामागे १०० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,५३६ रुपये आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर
आज २२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील १० रुपयांनीच घसरण झाली आहे. प्रति तोळा सोन्याचे दर ८९,९९० रुपये आहेत. काल हे दर ९०,००० रुपये होते. ८ ग्रॅम सोन्याचे भाव ७१,९९२ रुपये आहे.
१८ कॅरेट सोन्याचे दर
आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात १० तोळ्यामागे १०० रुपयांनी घट झाली आहे. प्रति तोळ्यामागे १० रुपयांनी घसरण झाली आहे. आज प्रति तोळा सोन्याचे दर ७३,६३० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५८,९०४ रुपये आहेत.
सोनं खरेदी करणे ही एक गुंतवणूकच आहे. सोन्याचे दर आजपर्यंत फक्त वाढतच गेले आहेत. इथून पुढेही अनेक वर्ष सोन्याचे भाव वाढतच जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही आज सोने खरेदी केले तर भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. परंतु सध्या सोन्याचे दर लाखांवर गेले आहेत त्यामुळे हेदेखील सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीये.
Discussion about this post