जळगाव । सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शनिवारी सोने दरात घसरण झाली. मात्र चांदी दरात मोठी उसळी दिसून आली. सकाळच्या सत्रात सोने दरात ५१५ रूपयांची घट झाली. तर चांदी दरात १०३० रूपयांची वाढ झाली.
भारतीय रुपयाच्या कमकुवतपणाचा परिणाम स्थानिक बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमतींवरही होत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरल्याने आयात केलेल्या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तथापि, सोन्याच्या किमतीवर रूपयाच्या कमकुवतपणामुळे होणारा परिणाम मर्यादित झाला आहे. अलीकडे सोन्याच्या किमतीत झालेली घसरण ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक संधी निर्माण करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जळगाव शहरातही सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी दिवसभरात पुन्हा ८२४ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोने जीएसटीसह एक लाख ३२ हजार ५६१ रूपयांपर्यंत पोहोचले होते. शनिवारी सकाळी बाजार उघडल्यावर ५१५ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३२ हजार ०४६ रूपयांपर्यंत खाली आले.
शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी १०३० रूपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ८४ हजार ३७० रूपयांवर स्थिरावली होती. शनिवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी १०३० रूपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ८५ हजार ४०० रूपयांपर्यंत वधारली.















Discussion about this post