मुंबई । आशियायी बाजारांमध्ये तेजी आली आहे. परिणाम भारतीय शेअर बाजारातील तेजीवर दिसून आला. भारतीय शेअर बाजाराने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. काल सोमवारी सेन्सेक्सने ६८,९१८.२२ अंकांच्या सार्वकालिक उच्चांक गाठला, तर सोन्याच्या दरानेही प्रति तोळा ६३,८०५ रुपयांचा आजवरचा सर्वाधिक दर गाठला. दरम्यान,आज सकाळी साडे दहा वाजेपर्यंत सेन्सेक्स ६९२८७ वर व्यवहार करतोय दुसरीकडे निफ्टी २०८२३ वर ट्रेंड करत आहे.
दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ७.६ टक्क्यांवर पोहोचल्याने भारतात परदेशी संस्थांच्या गुंतवणुकीत वाढ होण्याचा अंदाज आहे. १ डिसेंबरला परकीय संस्थांनी बाजारात १,५८९ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
नववर्षात सोन्याचे भाव ६५ हजारांवर जाणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. इस्रायलने पुन्हा हल्ले तीव्र केल्याने त्याचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर होत असून, त्यांचे भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहेत. आतंरराष्ट्रीय पातळीवरील या घडामोडींमुळे वाढती मागणी लक्षात घेता नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच सोन्याचे दर ६५ हजारांचा पल्ला ओलांडणार असल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे.
Discussion about this post