मुंबई । सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार होत आहेत. सणासुदीच्या दिवसात अनेकजण सोने खरेदी करतात. परंतु सोन्याचे वाढते दर पाहून खरेदी करण्याकडे खरेदीदारांनी पाठ फिरवली आहे. दरम्यान आज सोने दरात मोठी वाढ झाली असून सोन्याचा तोरा पुन्हा विनाजीएसटी एक लाखाच्यावर पोहोचला आहे. यामुळे खरेदीची योजना आखणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.
आज १ तोळा सोन्यामागे ८२० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,०२,२२० रुपये आहेत. तर ८ ग्रॅम सोन्याच्या दरात ६५६ रुपयांची वाढ झाली असून हे दर ८१,७७६ रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर १०,२२,२०० रुपये आहेत. १० तोळा सोन्याच्या दरात ८२०० रुपयांनी वाढ झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचे दर
आज २२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील वाढ झाली आहे. या दरात ७५० रुपयांची वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचे दर ९३,७०० रुपये आहेत. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७४,९६० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ९,३७,००० रुपये आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर
आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ६२० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर ७६,६७० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६१,३३६ रुपये आहेत. १० तोळ्याचे दर ७,६६,७०० रुपये आहेत.
चांदीचे दर
आज चांदीच्या दरात फार काही बदल झालेला नाही. ८ ग्रॅम चांदीची किंमत ९२० रुपये आहे.१० ग्रॅम चांदीचे दर १,१५० रुपये आहेत. १०० ग्रॅम चांदीचे दर ११,५०० रुपये आहेत.
Discussion about this post