जळगाव । जळगाव सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावाने ग्राहकांना घाम फोडला आहे. पितृपक्ष सुरू होताच सोने आणि चांदीत तुफान उसळी आली आहे. त्यामुळे नवरात्र,दसरा आणि दिवाळीत सोनं आणि चांदी मोठा पल्ला गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 1,08,490 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 99,450 रुपये झाला आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 81,370 रुपये आहे.
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचा दर प्रति ग्रॅम 128 रुपये असून, प्रति किलोग्रॅमसाठी 1,28,000 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या किमतीत 2.5% ची मोठी वाढ झाली आहे.
या वाढीमागचं मुख्य कारण अमेरिकेतील कमजोर रोजगार आकडेवारी आहे. फेडरल रिझर्व्ह या वर्षी तीन वेळा व्याजदरात कपात करेल अशी अपेक्षा वाढली आहे. आता बाजार पुढील आठवड्यात होणाऱ्या फेडच्या बैठकीत 0.25% कपातीची शक्यता लक्षात घेऊन उत्सुक आहे.















Discussion about this post