जळगाव । जागतिक घडामोडीमुळे आज मंगळवारी जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोन्याने ऐतिहासिक झेप घेतली. दुसरीकडे चांदीच्या दरातही काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
जळगावमध्ये एक सप्टेंबरला २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख आठ हजार ४५९ रूपयांपर्यंत होते. नंतरच्या काळात कमी-अधिक प्रमाणात सातत्याने दर वाढत राहिल्याने आज मंगळवारी सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १३ हजार १९७ रूपये झाले. सोने दरात १ ते ९ सप्टेंबरच्या कालावधीत तब्बल ४७३८ रूपयांनी वाढ झाल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
चांदीत १०३० रूपयांची वाढ
जळगावात गेल्या आठवडाभरापासून चांदीच्या दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आली नव्हती. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख २८ हजार ७५० रूपयांपर्यंत स्थिर होते. मात्र, मंगळवारी सकाळी बाजार उघडताच १०३० रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख २९ हजार ७८० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.















Discussion about this post