मुंबई । सोन्याच्या दरात सुरू असलेली वाढ शुक्रवारी सुद्धा कायम दिसत आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदी मात्र, स्वस्त झाली आहे. सोने महागल्याने नागरिकांना दागिने खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जाणून घ्या सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच देशासह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा आणि चांदीचा आजचा दर काय आहे.
शुक्रवारी (18 जुलै 2025) सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 500 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 9,93,300 रुपयांवरुन 9,93,800 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर 99,330 रुपयांवरुन 99,380 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
आजचा चांदीचा दर किती?
सोन्याच्या दरात वाढ झालेली असतानाच चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. या घसरणीमुळे चांदीचा दर 1,14,000 रुपये प्रति किलोग्रॅमवरुन 1,13,900 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे.
Discussion about this post