जळगाव । गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात मोठी तेजी दिसून आली. सोन्याचे दर कधी कमी होणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागले असून मात्र यातच रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवरून भारत-अमेरिकेतील वाढता तणाव आणि भारतावर भरमसाट कर लादण्याची ट्रम्प यांच्या नव्या धमकीमुळे सोन्याने बुधवारी सर्वकालीन उच्चांक गाठला.
सोन्याच्या भावात दोन दिवसात ८०० रुपयांची वाढ होऊन बुधवारी ते सर्वकालीन उच्चांकासह एक लाख एक हजार रुपयांवर पोहोचले आहे. चांदीमध्ये एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख १४ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. यापूर्वी २३ जुलै व ५ ऑगस्ट रोजी सोने एक लाख ८०० रुपयांवर होते. एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह आता एक लाख चार हजार ३० रुपये मोजावे लागणार आहे.
४ ऑगस्ट रोजी सोने एक हजार ७०० रुपयांनी वधारून एक लाख २०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी ६०० व ६ ऑगस्ट रोजी पुन्हा २०० रुपये अशी दोन दिवसात ८०० रुपयांनी वाढ होऊन सोने एक लाख एक हजार रुपये तोळ्यावर पोहोचले. दुसरीकडे ४ ऑगस्ट रोजी एक हजार रुपयांची वाढ होऊन एक लाख १३ हजार रुपयांवर पोहोचलेल्या चांदीच्या भावात ५ ऑगस्ट रोजी ३०० रुपयांची व ६ ऑगस्ट रोजी एक हजार २०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी एक लाख १४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.
Discussion about this post