जळगाव । गणेशोत्सव सुरु आहे. आणि सणासुदीच्या दिवसात सोने-चांदी खरेदी केलेले चांगले असते, असं म्हणतात. परंतु सोन्यासह चांदीचा भाव गगनाला भिडले आहेत. दरम्यान सुवर्णनगरीत जळगावमध्ये आज सोमवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही धातुंच्या दराने शनिवारचा उच्चांक मोडीत काढून पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित केला.त्यामुळे सध्या सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
जळगावमध्ये आज सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. जगभरातील बाजारपेठांमध्ये अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमती पुन्हा एकदा वाढत असताना, जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख सात हजार १२० रूपयांपर्यंत पोहोचले होते. सोमवारी सकाळी बाजार उघडताच प्रति १० ग्रॅम १३३९ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने २४ कॅरेट सोन्याच्या दराने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख आठ हजार ४५९ रूपयांपर्यंत मजल मारून नवा उच्चांक निर्माण केला.
चांदीत २५७५ रूपयांची वाढ
जळगावमध्ये शनिवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख २५ हजार ६६० रूपयांपर्यंत पोहोचले होते. सोमवारी सकाळी बाजार उघडताच प्रति किलो २५७५ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदीच्या दराने जीएसटीसह प्रति किलो एक लाख २८ हजार २३५ रूपयांपर्यंत झेप घेतली.















Discussion about this post