मुंबई : सध्या देशभरात लग्नसराईचे दिवस सुरु आहे यामुळे अनेक जण सोने आणि चांदी खरेदी करतात. मात्र मागच्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या किमतीने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. पण आता खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.तुम्हालाही सोन्या-चांदींचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.
आजचा काय आहे दर
आज, 18 मे रोजी सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 57,650 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 60,530 रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव 78,200 रुपये प्रति किलो झाला आहे.
चांदीच्या भावात आज 600 रुपयांनी घट झाली आहे. आज चांदी 78,200 रुपये प्रति किलो भावाने विकली जाईल. तर काल (बुधवार) सायंकाळपर्यंत 78,800 रुपये दराने चांदीची विक्री झाली आहे.
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.
बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
Discussion about this post