मुंबई । गेल्या आठवडाभरापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळपासून त्यात सुधारणा दिसून आली. मात्र बुधवारी सराफा बाजार पुन्हा एकदा लाल चिन्हाने उघडला आणि दोन्ही धातूंच्या किमतीत किंचित घट नोंदवण्यात आली. काल (मंगळवारी) सराफा बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. त्यानंतर २२ कॅरेट सोन्याचा भाव ८७० रुपयांनी घसरून ५२,०५२ रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ५६,७४० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
त्यानंतर दोन्ही धातूंचे भाव सुधारल्यानंतर बाजार बंद झाला, मात्र बुधवारी पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा भाव ५४ रुपये घसरणीसह ५६ हजार २२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर चांदीची किंमत ४१० रुपयांनी घासून ६६ हजार ९८४ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली आहे. दरम्यान, आगामी काळात सोने-चांदीच्या वायदे दरात वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली असून तज्ञांनी कमी किंमतीत खरेदीचा सल्ला दिला आहे.
दुसरीकडे, गुडरिटर्न्सनुसार देशांतर्गत सराफा बाजारात २२ कॅरेट १० ग्रॅम सोने ५२ हजार ५९० रुपये तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५७ हजार ३७० रुपयावर घसरला आहे. तसेच प्रति किलो चांदीची किंमत ३०० रुपये कमी होऊन ७० हजार ७०० रुपये झाली आहे. पितृपक्ष काळात सोने-चांदी खरेदी शुभ मानली जात नाही त्यामुळे सराफा बाजारात मौल्यवान धातूच्या मागणीत घट झाली ज्याचा परिणामी किमतींवर होत आहे.















Discussion about this post