नवी दिल्ली : गेल्या तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात पडझड सुरु आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीने नवा रेकॉर्ड केला होता. ऐन लग्नसराईत झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांना मोठा झटका बसला होता. मात्र मागील काही दिवसापासून दोन्ही धातूंमध्ये घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
सोने-चांदीचा भाव काय
goodreturns नुसार आज सोन्यात सकाळच्या सत्रात प्रति 10 ग्रॅमची 10 रुपयांची घसरण झाली. काल संध्याकाळपर्यंत 150 रुपयांची घसरण झाली. शनिवारी 22 कॅरेटचा भाव 55,790 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. IBJA नुसार, शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,142 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 22 कॅरेटचा भाव 55,090 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर एक किलो चांदीचा भाव 70,500 रुपये आहे.
24, 23, 22 कॅरेटचा भाव
ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,142 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 59,901रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,090 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,107 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.
Discussion about this post