जळगाव । २०२५ मध्ये, सोन्याच्या किमती एका नवीन शिखरावर पोहोचले आहे आणि त्याची चमक सतत वाढत आहे. दरम्यान गेल्या २४ तासात जळगावात सोन्याच्या दराचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. सोबतच चांदीने देखील उसळी घेतलीय
जळगावातील जगप्रसिद्ध सराफ बाजारात सोन्याच्या दरात 24 तासात तब्बल 1400 रुपयांनी वाढ झाली असून पहिल्यांदाच सोने विना जीएसटी १ लाखांवर पोहोचले आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा झाला आहे. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ३ हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
सोन्याचे भाव गगनाला भिडले असतानाच चांदीचे दराने सुद्धा विक्रमी उच्चांकी गाठली आहे. आता इतिहासात पहिल्यांदाच चांदीचे दर जीएसटी सह १ लाख १८ हजार ४५० रुपयांवर पोहोचले आहेत.
शेअर बाजारात मंदी असल्याने सोन्याच्या गुंतवणकीकडे वळलेल्यांना याचा फायदा होणार आहे. परंतू सणासुदीच्या तोंडावर सोने खरेदी करणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
Discussion about this post