मुंबई । दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे भाव वाढू लागले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचा दर पुन्हा 60,000 च्या पुढे गेला आहे. याशिवाय चांदीने 72,000 हजाराची पातळीही ओलांडली आहे. डॉलरची वाढ आणि अमेरिकेतील व्याजदरातील हालचालींमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरचा दर
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 60235 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदीचा भाव 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 72591 रुपये प्रति किलोवर आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, बुधवारी संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60618 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्याच वेळी, आज सकाळी हा भाव 60453 रुपये होता.
22 कॅरेट सोन्याचा भाव 56100 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. याशिवाय मुंबईत 55,950 रुपये, चेन्नईमध्ये 56,450 रुपये आणि कोलकातामध्ये 55,950 रुपये आहे.
सोन्याचे दर IBJA आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज दोन्हीद्वारे जारी केले जातात. हे दर वेगवेगळ्या शुद्धतेनुसार जारी केले जातात. या किमतींमध्ये कर आणि मेकिंग चार्जेस समाविष्ट नाहीत. या किमतींवर कर आणि मेकिंग चार्जेस लावल्यानंतरच तुम्हाला सोन्याचे दागिने बाजारात मिळतात.