जळगाव | शहरातील बालनाट्य चळवळीत सातत्याने अग्रेसर असणाऱ्या नाट्यरंग थिएटर्स जळगाव व गोजराई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.२५) छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ रोड येथे बालनाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या बालनाट्यमहोत्सवात बालप्रेक्षकांचे मनोरंजनातून प्रबोधन करणारी कोर्ट ऑफ कार्लेकर व वाघोबा ही दोन बालनाट्ये सादर करण्यात येणार आहे.
नाट्यरंग थिएटर्सचे संचालक अमोल ठाकूर यांनी लिहिलेली व दिग्दर्शित केलेल्या या बालनाट्यात कोर्ट ऑफ कार्लेकरमध्ये आपल्या आहारातील कारले, मेथी, पालक आदी भाज्यांचे महत्व सांगण्यात येणार असून, दुसरे बालनाट्य वाघोबामध्ये लहान मुलांना आपल्या जीवनातील जंगले व त्यातील वन्यप्राणी यांचे महत्व विषद करण्यात येणार आहे
या दोन्ही बालनाट्यांमध्ये जळगावातील स्थानिक कलावंत सहभागी आहेत. यात कोर्ट ऑफ कार्लेकरमध्ये शर्वा जोशी, अथर्व रंधे, वैष्णवी पाटील, श्लोक गवळी, दृष्टी ठाकूर, मयंक ठाकूर, निर्गुणी बारी, कृष्णा पाटील, अथर्व पाटील, प्रणव जाधव, रागिणी सोनवणे, अंशा चव्हाण तर वाघोबा बालनाट्यात कृष्णा चव्हाण, कृतिका कोरे, प्रणित जाधव, प्रणव जाधव, श्लोक गवळी, केतकी कोरे, शर्वा जोशी, रागिणी सोनवणे, आदर्श सोनवणे, वृषभ मुणोत, कृष्णा पाटील, पीयूष भुक्तार, अथर्व पाटील या बालकलावंतांचा सहभाग असणार आहे.
या बालनाट्यांच्या तांत्रिक बाजू रंगभूषा वेशभूषा दिशा ठाकूर, प्रकाशयोजना स्वप्नील गायकवाड, संगीत अथर्व रंधे, नेपथ्य सचिन कापडे, रंगमंच व्यवस्था – गोपाल जोशी ज्ञानेश्वर वाघ पंकज बारी दीपक महाजन सचिन महाजन नेहा पवार धनश्री जोशी दर्शन गुजराथी सागर चौधरी प्रथमेश जोशी आकाश भावसार मोहित पाटील पंकज वारुळे आदी सांभाळणार असून, पालकांनी आपल्या पाल्यांसह जास्तीत जास्त संख्येने येऊन या बालनाट्यांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन नाट्यरंग थिएटर्स व गोजराई फाऊंडेशन यांनी केले आहे.
Discussion about this post