जळगाव । जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील ४६ हजार हेक्टर क्षेत्रासाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या गिरणा नदीच्या धरणात गेल्या २४ तासात मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढत जात आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे गेल्या २४ तासात गिरणा धरणातील जलसाठा २० टक्क्यांनी वाढला आहे. रविवारी सकाळपर्यंत १५ टक्क्यांवर असलेला जलसाठा सोमवारी रात्रीपर्यंत ३५ टक्क्यांवर पोहोचला होता.
दरम्यान, गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरूच आहे. यासह गिरणा धरणात चणकापूर, हरणबारी या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढला आहे. यामुळे गिरणा धरणाच्या जलपातळीत वाढ होत आहे. जर अशाच प्रकारे धरणात विसर्ग वाढत राहिला तर येत्या काही दिवसात गिरणा धरणातील पाण्याची पातळी ५० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
गेल्यावर्षी राज्यभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. त्यामुळे गिरणा धरण पूर्णपणे भरले नव्हते. यंदाही जून-जुलै महिन्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रातच पावसाने पाठ फिरवल्यामुळे गिरणा धरणातील जलसाठ्यात फारशी वाढ होत नव्हती. मात्र, गेल्या चार दिवसांच्या पावसातच गिरणा धरणातील जलसाठा वाढत जात आहे
Discussion about this post