जळगाव । आगामी काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा धुरळा उडणार असून याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून राज्यभरात आकड्यांची जुळवाजुळव केली जात आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार महायुती अन् मविआची थेट लढत होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कारण, अनेक ठिकाणी प्रत्येक पक्षाकडून स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात येतेय. अशातच अशातच आता भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मित्रपक्षांना इशारा दिला आहे.
काय म्हणाले मंत्री महाजन?
युती झाली नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांना पाडणार असं वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदानंद शेट्टी यांनी केले आहे. यावर बोलताना महाजन म्हणाले की, ‘युती नाही झाली तर आपण एकमेकांना निवडून आणण्यासाठी थोडंच उभ राहणार आहोत. मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी आम्ही एकमेकांना पाडणारच आहोत. एकमेकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार नाही.’ गिरीश महाजन यांच्या या विधानामुळे आगामी स्थानिक स्वरांज्य संस्थांच्या निवडणूकीत सर्वच पक्षांची राजकीय ताकद पणाला लागणार असल्याचे दिसत आहे.
वरिष्ठ स्तरावरून आदेश आहेत, आम्ही या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहोत. मात्र ज्या ठिकाणी शक्य नसेल अशा काही अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. महायुती मिळून एकत्र लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण काही ठिकाणी जमलं नाही तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आम्ही करू.’ असं मंत्री महाजन म्हणाले















Discussion about this post