जळगाव । ठाकरे गटाचे नेतेउन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या लुटारू गँगचे प्रमुख गिरीश महाजन असल्याचा गंभीर आरोप उन्मेष पाटीलांनी केला आहे. दरम्यान उन्मेष पाटील यांच्या आराेप मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळून लावताना पाटील यांच्या डाेक्यावर परिणाम झाल्याचे नमूद केले
उन्मेष पाटील म्हणाले पीक विमा असो की कर्ज पूर्नगठण असो यामधे शेतकऱ्यांची जिल्हा बँक फसवणूक करत आहे. या जिल्हा बँकेत फसवणूक करणारे नेते हे मंत्री गिरीश महाजन यांनी तोड फोडचे राजकारण करून बसवलेले नेते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लुबाडणूक करण्याला जसे हे नेते जबाबदार आहेत तशाच पद्धतीने त्यांना त्या पदावर बसविणारे मंत्री गिरीश महाजन देखील या गँगचे प्रमुख आहेत असे पाटील यांनी म्हटले.
निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा समस्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले.आता निवडणूक संपली असल्याने तातडीने बॅंकेने शेतकऱ्यांसाठी पीक विमा मिळण्यासाठी, कर्ज मिळण्यासाठी, भाव मिळण्यासाठी काम केले पाहिजे. अन्यथा शेतकऱ्याचा उद्रेक पाहायला मिळेल अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली. शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा उन्मेष पाटील यांनी दिला.
महाजनांनी पाटलांचे आराेप फेटाळले
दरम्यान उन्मेष पाटील यांचे सर्व आराेप गिरीश महाजन यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना काही तरी वेड्या सारखे बडबड करायची सवय लागली आहे.
Discussion about this post