जळगाव । गेल्या काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. आश्वासन, टीका-टीप्पण्णी करणे या पलिकडे सरकारने काय केले आहे? शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलीय, हीच मोदींची गॅरंटी असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवारांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मोदी गॅरंटी काय आहे हे जनतेला माहीत आहे. शरद पवार इतके वर्ष राज्यात होते. तुम्ही राज्यासाठी काय केले? कृषीमंत्री असताना त्यांनी काय दिवे लावले असे त्यांना विचारले तर त्यांना वाईट वाटेल. मोदी गॅरंटीची तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा, लोक सांभाळा. तुमचे खाते उघडण्याच्या तयारीत राहा. उगाच कोणी काय केले असे विचारत बसू नका, अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दोन दिवसांत जाहीर होईल, अशी माहिती महाजन यांनी माध्यमांशी बोलताना जळगावात दिली. जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघांत भाजपची उमेदवारी कोणाला? असे विचारले असता मात्र, त्यांनी आपल्याला माहीत नसल्याचे उत्तर दिले आहे.
Discussion about this post