जळगाव । सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून याचदरम्यान शरद पवार यांची तब्येत खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तर बारामतीतील प्रचार सांगता सभेत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या डोळ्यात पाणी आलं. यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी टीका केली आहे.
मंत्री महाजन काय म्हणाले…
शरद पवार यांची तब्येत कमी जास्त असते. त्यांना त्रास होत असतो. त्यांच्या प्रकृतीवर बोलणं उचित होणार नाही. परंतु रोहित पवार दोन-तीन शब्द बोलले की ..काय झालं की लगेच रडायला लागतात. मला वाटतं रडून निवडणुका लढता येणार नाही आणि त्या जिंकता सुद्धा येणार नाहीत. त्यामुळे लोकांना तुम्ही फार काळ वेळ बनवू शकणार नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.
रोहित पवारांना सल्ला
मुद्द्यावर बोला देशाच्या प्रश्नांवर बोला कामावर बोला तर तुम्ही मत मागा. आता रोहित पवार यांना मी बघितला आहे की ते सभेत ते वारंवार रडतात, डोळे पुसतात. तुम्ही तरुण आहात तुम्ही म्हणतात की तुमच्या मागे मोठी ताकद आहे. त्यामुळे तुम्ही मुद्द्यावर बोला आणि मत मागा…, असा सल्ला गिरीश महाजनांनी रोहित पवारांना दिलाय.
Discussion about this post