जळगाव । काल बुधवारी जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या करण पवार आणि श्रीराम पाटील यांनी उमेदवार अर्ज भरला यांनतर सभेत संजय राऊतांनी भाजपासह शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका करताना भाXXX असा शब्द वापरला. यामुळे राजकीय क्षेत्रात गदारोळ उठला. याच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नवनीत राणा या महिला उमेदवाराबद्दल ते इतक्या आक्षेपार्य आणि घाण पद्धतीने बोलले की मी बोलू शकत नाही.त्यांनी फक्त आता शिवा द्यायचं सोडला आहे..एवढ्या घान पद्धतीने ते काल बोलले त्यांच्याबद्दल बोलून आम्हालाही तोंड खराब करायचं नाहीये.असं गिरीश महाजन म्हणाले.
आता लोकच त्यांना मतदानातून उत्तर देतील. जळगाव जिल्ह्यात आज गर्दीचा आकडा असेल तो विक्रमी आणि रेकॉर्ड ब्रेक असेल, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले. आज महायुतीचे जळगाव आणि रावेर मतदार संघासाठी भाजपचे उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. यावेळी गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली आहे
खडसे प्रवेशाबाबत माझी परवानगीची गरज नाही
एकनाथ खडसे मोठे व्यक्ती आहेत. यांनी स्वतः सांगितले आहे की, मी थेट नरेंद्र मोदी, अमित शहा, नड्डा यांच्याशीच बोलतो. त्यामुळे माझ्या परवानगीचा प्रश्न येत नाही. रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे एकच कुटुंबातले आहे. त्यामुळे आपण जेष्ठ यांचे आशीर्वाद घेतो तसे रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या आशीर्वाद घेतले आहेत.















Discussion about this post