जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने तातडीने हवाई रुग्णवाहिकेने जळगावहून मुंबईला हलवण्यात आले होते. तिथे उपचार घेतल्यानंतर त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आता त्यांच्या या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे
ते म्हणाले की, एकनाथ खडसेंना स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्याचे सांगा. सर्व प्रश्न आपोआप सुटतील. 137 कोटींची नोटीस आल्यानंतर सोंग करायचे. काही झाले नसताना दवाखान्यात जाऊन बसायचे. केवळ नोटीस आल्यामुळे त्यांनी कोर्टाची सहानुभूती मिळवण्यासाठी आजारापणाचे नाटक केले.
त्यांना असा कोणता हृदयविकाराचा झटका आला? खोटी सोंगं करायची. उपचार घ्यायचे आणि परत इकडे येऊन आरोप करायचे. याला काय म्हणावे? त्यापेक्षा त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे गिरीश महाजन खडसेंवर हल्लाबोल करताना म्हणाले. महाजन यांनी बुधवारी सरकारच्या योजनांच्या जागर रथाला हिरवी झेंडी दाखवली. त्यावेळी ते बोलत होते.
Discussion about this post