जळगाव । खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली होती. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे,’ अशी असं उदयनराजे म्हणाले होते.
आता उदयनराजे यांच्या टीकेनंतर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी देखील शरद पवार यांच्यावर टोला हाणला आहे. शरद पवारांना अनेक जण म्हणत आहेत ते आता त्यांनी निवृत्ती घेतली पाहिजे..पण काही लोकांना वय 85-90 वर्ष झालं तरी पंतप्रधान व्हावेसे वाटते, असा टोला गिरीश महाजनांनी लगावला.
तसेच एकनाथ खडसे यांच्यावरही जोरदार टीका केली. एकनाथ खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांच्या डोक्याचा इलाज करावा लागेल. ते पंधरा दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते मात्र त्यांच्यावर अजून दाखल करून उपचार करायला हवा..शासकीय खर्चाने त्यांच्यावर उपचार करू, असं गिरीश म्हणाले.
Discussion about this post