जळगाव । मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे दोन्ही नेते एकमेकांना संधी मिळेल तसे डिवचतात. सध्या हनी ट्रॅप प्रकरणात अटक केलेल्या प्रफुल्ल लोढा याच्यावर दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहे. अशातच मंत्री महाजन यांनी पुन्हा एकदा खडसेंवर निशाणा साधला आहे.
हनी ट्रॅपचा संदर्भ देत, झाली ना त्याच्यावर कारवाई, एवढ्या कारवाया झाल्या, आता मी ऐकत होतो दोन-तीन गुन्हे कशावर असा वेगवेगळ्या ठिकाणच्या महिला आहेत. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये असेल पुण्यामध्ये असेल नाशिकमध्ये असेल कोणी महिलांनी तक्रार दिली असेल तर गुन्हे दाखल होईल तुम्हाला काय एवढं पोटसूळ उठलं आहे, असा टोला महाजनांनी खडसेंना लगावला. तुम्ही बोलणार नाहीये कारण त्यांचा मानसिक संतुलन खरंच बिघडलेला आहे आता मी त्यांची मुलाखत बघत होतो मोबाईलवर कोणीतरी मला दाखवली ती खरंच मला त्याची कीव येत आहे. म्हणजे मला राग येत नाही खडसेंचा पण कीव येते, असे वक्तव्य महाजनांनी केले.
मग दिल्लीत जाऊन पाया पडतात
आता हे म्हणतात मी काय केलं? तुमचे ते भोसरी प्रकरण माहिती आहे. तुम्ही चोऱ्यामाऱ्या करता. डाके टाकता आणि वर दिल्लीत जाऊन अक्षरशः आडवे पडून पायावर पडतात. आमच्या नेत्यांच्या आणि त्यांच्याकडून इथे सूट मिळवून देत आहे. म्हणून सगळ्या प्रकार चाललेला आहे. माफ करा माफ करा माफ करा हा धंदा त्यांचा चाललेला आहे, असा टोला महाजनांनी खडसेंना लगावला. ते वायफळ बडबड करतात. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना इतके असह्य झालेले बघवत नाही. त्यामुळे त्यांच्यावर मी फार बोलणार नाही, असे महाजन म्हणाले.
Discussion about this post