नागपूर । देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील नव्या सरकारचा मंत्रिमंडळाचा पहिला शपथविधी आज नागपूरमध्ये पार पडून यावेळी जळगाव जिल्ह्यातील भाजपचे आमदार गिरीश महाजन आणि शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दोघांना राज्यपालांनी गोपनीयतेची शपथ दिली.
विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन जामनेर मधून तर शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीणमधून निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत जिल्ह्यातील ११ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले.
गुलाबराव पाटील हे मागील सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्री होते. तर गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री होते. आता दोघांना कोणतं खातं मिळणार हे गुलदस्त्यात आहे.
Discussion about this post