जळगाव । भुसावळ तालुक्यातील महार वतनाच्या जमिनीच्या खरेदी प्रकरणावरून माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक चकमक रंगली आहे. अशातच खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर खोचक टीका केलीय. “गिरीश महाजन हे त्यावेळी आमचं बाळ होते, त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार केली नाही,” अशी टीका खडसेंनी केली.
मंत्री गिरीश महाजन यांनी महार वतनाची जमीन खरेदी प्रकरणावरून खडसे यांना निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचे खुले आव्हान दिले होते. याला प्रत्युत्तर देताना खडसे यांनी उपरोधिक भाषेत प्रतिक्रिया दिली. त्यावेळी आमचे बाळ होते, त्यामुळं तक्रार केली नाही अशी टीका खडसेंनी केली आहे.
दरम्यान, महार वतनाच्या जमिनीच्या खरेदीबाबत आरोप झाल्यानंतर बोदवड पोलीस ठाण्यात एकनाथ खडसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे.
याचवेळी खडसे यांनी बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भातही भाष्य केले. “बारामतीची जागा बिनविरोध झाली असती तर बरं झालं असतं. मोठ्या नेत्याच्या निधनानंतर अशा वेळी सहमतीने निवडणूक होणे अपेक्षित असते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.















Discussion about this post